Advertisement

प.रे. स्टेशन्सवर टॉयलेटच्या तक्रारींसाठी क्यू आर कोड स्कॅन सुविधा


प.रे. स्टेशन्सवर टॉयलेटच्या तक्रारींसाठी क्यू आर कोड स्कॅन सुविधा
SHARES

समजा, तुम्ही मुंबईतल्या एखाद्या रेल्वे स्टेशनवर आहात आणि तुम्हाला स्टेशनवरच्याच टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ आली, तर तुमच्या डोक्यात पहिला विचार काय येईल? अर्थात! 'ते टॉयलेट स्वच्छ असेल का?' किंवा तुम्हाला त्या टॉयलेटची परिस्थिती माहित असेल, तर 'पुन्हा त्या घाणेरड्या टॉयलेटमध्ये जावं लागणार!' किंवा अनेकदा आपण अशा टॉयलेटमध्ये न जाणंच पसंत करतो.

रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा आणि अनेकांनी तक्रारी करूनही रेल्वे स्टेशनवरच्या टॉयलेटच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेल्या दिसत नाहीत. पण आता पश्चिम रेल्वेने मुंबईकर प्रवाशांच्या टॉयलेटबद्दल प्रतिक्रिया आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी एक अत्याधुनिक आणि कालसुसंगत पद्धत सुरु केली आहे. क्यूआर कोड (QR Code)वर आधारित ही प्रणाली लवकच कार्यान्वित होणार आहे.


कशी असेल ही प्रणाली?

या 17 स्टेशन्सवरच्या प्रत्येक टॉयलेटबाहेर भिंतीवर एक क्यू आर कोड लावलेला असेल. प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवरून हा क्यू आर कोड स्कॅन करून थेट आपला फीडबॅक रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवता येईल.


'वर्ल्ड टॉयलेट डे'चं निमित्त

19 नोव्हेंबर या वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने या नव्या फीडबॅक सिस्टीम अर्थात प्रतिक्रिया प्रणालीची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील 17 रेल्वे स्टेशन्सवर ही प्रणाली कार्यान्वित असेल.


फीडबॅकवर कारवाई होणार का?

मुंबईकरांनी या क्यू आर कोडवरून दिलेल्या फीडबॅकवर लागलीच कारवाई केली जाईल असं आश्वासन पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलं आहे. ही कारवाई एकतर संबंधित खाजगी कंत्राटदारावर दंड आकारणीच्या स्वरूपात असेल किंवा त्याला काळ्या यादीत टाकलं जाईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


क्यू आर कोड उपलब्ध असणारे रेल्वे स्टेशन्स

  1. चर्चगेट
  2. मरीन लाईन्स
  3. चर्नी रोड
  4. ग्रँट रोड
  5. लोअर परेल
  6. एलफिन्स्टन रोड
  7. दादर
  8. माटुंगा रोड
  9. माहिम
  10. वांद्रे
  11. गोरेगाव
  12. अंधेरी
  13. कांदिवली
  14. बोरिवली
  15. दहिसर
  16. भाईंदर
  17. नालासोपारा



हेही वाचा

मध्य रेल्वेवर बसवणार ५२ सरकते जिने, २५ लिफ्ट्स


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा