Advertisement

मध्य रेल्वेवर बसवणार ५२ सरकते जिने, २५ लिफ्ट्स


मध्य रेल्वेवर बसवणार ५२ सरकते जिने, २५ लिफ्ट्स
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेवर सरकते जिने आणि लिफ्ट्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहेे.


३१ मार्चपर्यंत ५२ सरकते जिने

मध्य रेल्वे स्थानकांवर येत्या ३१ मार्च २൦१८ पर्यंत ५२ सरकते जिने आणि २५ लिफ्ट्स बांधण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर २२ सरकते जिने आणि १३ लिफ्ट्स आहेत. पहिला सरकता जिना टिटवाळा स्थानकात बसवण्यात येणार आहे. तर, डिसेंबर महिन्यात दादर, ठाणे आणि डॉकयार्ड या तीन स्थानकांत सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी महिन्यात २१ आणि मार्च महिन्यात १४ सरकते जिने विविध स्थानकांवर बसवण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चार सरकते जिने लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बसवण्यात येणार आहेत. 


वर्षाखेरपर्यंत १८ लिफ्ट होणार सुरू

२५ पैकी १८ लिफ्ट या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार असून वडाळा आणि चेंबूर स्थानकांत प्रत्येकी तीन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. शिवाय, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, डॉकयार्ड, मानखुर्द, रे रोड या स्थानकांत लिफ्टचे काम सुरूही करण्यात आले आहे.


पश्चिम रेल्वेवरही सरकत्या जिन्यात वाढ

मध्य रेल्वेसोबतच पश्चिम रेल्वेवरही सरकत्या जिन्यांत वाढ करण्यात येणार आहे. सध्या, पश्चिम रेल्वेवर ३२ सरकते जिने असून आणखी १८ सरकते जिने बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.हेही वाचा

मध्य रेल्वेवर 7 महिन्यांत १൦൦ कोटींचा दंड वसूल!


संबंधित विषय
Advertisement