Advertisement

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या वाढणार

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची आगामी वर्षात धकाबुक्कीच्या प्रवासातून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे अर्थसंकल्पात अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालविण्याच्या प्रकल्पासाठी १२ कोटी मंजुर करण्यत आले आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या वाढणार
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची आगामी वर्षात धकाबुक्कीच्या प्रवासातून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे अर्थसंकल्पात अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालविण्याच्या प्रकल्पासाठी १२ कोटी मंजुर करण्यत आले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात १५ डबा लोकल धावण्यास सुरूवात होणार आहे.

१५ डब्यांच्या ५ लोकल

जानेवारीपासून १५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या ५ लोकल असून त्या चर्चगेट ते विरार जलद मार्गावर धावतात. या लोकलच्या दिवसभरात एकूण ५४ फेऱ्या होतात.

प्रवाशांना दिलासा

अंधेरी व विरारदरम्यान १५ डबा चालविण्यासाठी सुरू असलेल्या कामापैकी इंजिनीअरिंगचे ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. मात्र, ओव्हरहेड ट्रक्शन आणि सिग्नलिंगचे काम शिल्लक असून डिसेंबरपर्यंत फलाटांची लांबी वाढविण्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर जानेवारीपासून १५ डब्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.हेही वाचा -

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद

२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूचRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा