Advertisement

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला विशेष म्हणजे मुंबई उपनगरीय लोकलला नेमकं किती बजेट मंजूर झालं याची माहिती समोर येत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद
SHARES

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला विशेष म्हणजे मुंबई उपनगरीय लोकलला नेमकं किती बजेट मंजूर झालं याची माहिती समोर येत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत यांसह अनेक प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच, पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डबा प्रकल्पासाठी देखील १२ कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

निधी मंजुर 

अंतरिम अर्थसंकल्पात एमयूटीपी-, ३ व ३ ए साठी मंजूर झालेला निधीच कायम ठेवण्यात आला आहेएमयूटीपी- २ प्रकल्पासाठी २४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. एमयूटीपी प्रकल्पासाठी २८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसंच, एमयूटीपी प्रकल्पासाठी २८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

एमयूटीपी

 • सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग
 • परळ टर्मिनस
 • ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग
 • मुंबई ते बोरिवली सहावा मार्ग

एमयूटीपी-

 • विरार ते डहाणू चौपदरीकरण
 • पनवेल ते कर्जत नवीन मार्ग
 • ऐरोली ते कळवा लिंक रोड
 • ४७ वातानुकूलित लोकल

एमयूटीपी- ३ ए

 • बोरिवलीपर्यंत हार्बर
 • बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग
 • कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग
 • कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग
 • १९४ वातानुकूलित लोकल


जोगेश्वरीत नवं टर्मिनस

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून लांबपल्ल्याच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी  जोगेश्वरी स्थानकाजवळ नवं टर्मिनस उभारण्याच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलं आहे. तसंच, या टर्मिनसच्या कामसाठी  निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला. यंदा १० लाख रुपये मंजूर करण्यात आल्यानं काम सुरू करण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी डायमंड क्रॉसिंग आणि नवीन क्रॉस ओव्हर तयार करण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळते.हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, मात्र उत्पन्नात घट

२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूचRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा