Advertisement

माहिम रेल्वे स्थानकावर कोविड योध्यांना अनोखी सलामी


माहिम रेल्वे स्थानकावर कोविड योध्यांना अनोखी सलामी
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. अत्यावश सेवा बजवाणारे अनेक कर्मचारी नागरिकांचा ीव वाचवण्यासाठी आज ही रस्त्यावर स्वतःचा जी धोक्यात घालून उभे आहेत. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी ते दिवस रात्र झटत आहे. अशा अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. याच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांना कोरोना योध्यांना पश्चिम रेल्वेकडून अनोखी सलामी देण्यात आलेली आहे. 

हेही वाचाः- महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

पश्चिम रेल्वेने मागील काही दिवसांपासून रेल्वेची अनेक कामे हाथी घेतली होती. त्यात रेल्वेचे मेंटेनेन्स, स्थानकांवरील स्वच्छता आणि रंगरंगोटीची  कामे आता अंतिम टप्यात आहे. मात्र या कारणांमुळे सध्या संपूर्ण देश संकटात सापडला आहे. त्या संकटात नागरिकांना दिवस-रात्र सुविधा देणाऱ्या, कोरोनाशी दोन हात करत नागरिकांना मृत्यूच्या जबड्यातून वाचवणाऱ्या कोरोना योध्यांना अनोखी सलामी म्हणून St+art India Foundation आणि पेंट कंपनी यांच्या सहयोगाने माहिम रेल्वे स्टेशनवर कोरोना योद्धांची सुंदर चित्रं साकारली आहेत. माहिम रेल्वे स्टेशन मुंबईचे खरे हिरो  म्हणजेच कोरोना योद्धा (Corona Warriors) यांच्या सुंदर पेटिंग्सने सजले आहे.

हेही वाचाः- वसई-विरारमध्ये 'ह्या' विभागात १४ दिवसांचा कडक लाॅकडाऊन

या चित्रात आपल्याला पोलिस, सफाई कामगार, पीपीई कीट घातलेले डॉक्टर्स पाहायला मिळत आहेत. ही चित्रे अतिफ आणि राहुल मौर्य या कलाकारांनी साकारली आहेत. रस्त्यावरून जाताना अनेकांची नजर या चित्रांवर खेळती रहात आहे. ही चित्रं साकारण्यासाठी १०-१२ दिवसांचा कालावधी लागला. हे संकल्पना गुजरातच्या एका स्ट्रीट आर्टीस्टने डिझाइन केलेले असल्याचे सांगितले जाते. हे चित्र केवळ सौदर्यीकरणासाठी नसून कोविडमध्ये एकजुट आणि कोविड योध्यांकरता कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा