Advertisement

दुरुस्तीच्या कामासाठी बोरिवली, मालाड पादचारी पूल बंद

बोरिवली स्थानकातील पादचारी पूलाच्या पायऱ्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या तातडीनं दुरुस्त करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी बोरिवली, मालाड पादचारी पूल बंद
SHARES

प्रभादेवी (एलफिन्स्टन) स्थानकातील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावरील जीर्णावस्था झालेल्या पादचारी पुलांचे डागडूजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील जुने पूल पाडून त्याजागी नवे पूल उभारण्यात येत आहेत. त्यातच आता बोरिवली स्थानकातील पादचारी पूलाच्या पायऱ्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या तातडीनं दुरुस्त करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरील उत्तर दिशेला उतरणाऱ्या पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. तसंच, मालाड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर जाण्याकरीता असलेला भाग तोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पूल गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहे. उत्तरेकडील पादचारी पूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुलाच्या दक्षिणेकडील पायऱ्यांचा वापर प्रवाशांना करता येणार आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला २ अतिरिक्त एसी-3 टियर कोच



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा