Advertisement

मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला २ अतिरिक्त एसी-3 टियर कोच


मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला २ अतिरिक्त एसी-3 टियर कोच
SHARES

मुंबईकर प्रवाशांसह नाशिक-धुळे-जळगावकर प्रवाशांसाठी मध्य रेल्वेवर राजधानी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. सीएसएमटीहुन नाशिकमार्गे दिल्लीला जाण्याऱ्या या राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून बुधवार १३ आणि शनिवार १६ फेब्रुवारी रोजी सीएसएमटीहुन दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला २ अतिरिक्त एसी आणि ३ टियर कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

मध्य रेल्वेची ही पहिली राजधानी एक्स्प्रेस आठवडयाच्या बुधवारी आणि शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स इथून दुपारी २.५० वाजता सुटते. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी १०.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचते. त्याचप्रमाणे ही एक्स्प्रेस नाशिकमार्गे धावत असून कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर थांबते.

पश्चिम रेल्वेवरून मुंबई-दिल्ली अशा दोन राजधानी एक्स्प्रेस धावत असून आणखी एक नवी कोरी तिसरी राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वेवर सुरु करण्यात आली आहे. १९ जानेवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमारास मध्य रेल्वेवरून ही राजधानी दिल्लीला रवाना झाली होती.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

मध्य रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी विशेष तिकिट तपासक पथकाची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा