ट्रेन मालाडला थांबलीच नाही; मोटरमन आणि गार्ड निलंबित

 Malad
ट्रेन मालाडला थांबलीच नाही; मोटरमन आणि गार्ड निलंबित
Malad, Mumbai  -  

जर तुम्हांला उतरायचं असेल एका स्टेशनला आणि गाडी थांबवली दुसऱ्या स्टेशनला तर कसं वाटेल. हैराण झाला असाल ना? पण सोमवारी मुंबईकरांना याचा अनुभव आला. चर्चगेटहून मालाडला जाणारी लोकल मालाड स्थानकात न थांबता थेट कांदीवली यार्डात पोहोचली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. मोटरमन लोकल थांबवण्यास विसरल्यामुळे हा सगळा प्रकार घडला.

चर्चगेटहून सोमवारी सकाळी 11.06 मिनिटांनी सुटलेली लोकल मालाडला 11.55 मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र ही लोकल थेट कांदीवली यार्डात पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात कांदीवली स्थानकापर्यंत ट्रॅकवरून चालत जावे लागले. वैतागलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे जाऊन तक्रार केली. 

मोटरमन आणि गार्डला निलंबित करण्यात आलं आहे. लोकल थांबवण्यास विसरल्याची कबुली मोटरमनने दिली असली तरी लोकल न थांबवण्याचे कारण अजूनही समजू शकले नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महंदळे यांनी सागितले.

Loading Comments