प्रवाश्यांची रखडपट्टी थांबेल का?

टिटवाळा - संयमाचा बांध तुटल्यानं टिटवाळा येथे रुळांवर उतरलेले हे प्रवासी. सकाळी नेहमीच गाड्या लेट होतात याचा जाब विचारून झाला होता. उत्तर मिळत नव्हतं. त्याचा संताप अखेर बाहेर पडला.​  नेहमीच होणारी ही रड नको. त्यापेक्षा एक दिवस गेलेला बरा, आज काय तो फैसलाच होऊ द्या म्हणून प्रवासी चक्क रुळांवर उतरले. बुधवारी सकाळी ऑन ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करू, गाड्या वेळेवर चालवू आणि प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून गरजेनुसार त्यांना मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवासाची परवानगी देऊ, असं लेखी आश्वासन रेल्वेकडून टिटवाळ्यातल्या संतप्त रेल्वे प्रवाशांना देण्यात आलंय. ते रेल्वेला पाळावंही लागेल. अन्यथा, आधीच मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांकडून असंच आंदोलनं पुन्हा होण्याची भीती आहे. 

Loading Comments