Advertisement

लोकलमध्येही प्रवाशांना मिळणार 'फूल नेटवर्क'

लोकलमध्ये नेटवर्कच्या अडचणींमुळं प्रवाशांची अनेक कामं खोळंबतात.

लोकलमध्येही प्रवाशांना मिळणार 'फूल नेटवर्क'
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा प्रवासादरम्यान नेटवर्क इश्यूचा सामना करावा लागतो. रेल्वे स्थानक ते निश्चित स्थळापर्यंतचं अंतर हे जास्त असतं. त्यामुळं अनेक प्रवासी लोकलमध्ये आपल्या मनोरंजनासाठी मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर करून युट्यूब किंवा इतर सोशल मीडिया साईटवर टाइमपास करत असतात. तसंच, काही प्रवाशांना महत्वाचं कामही वेळेच करायचं असतं. परंतू, लोकलमध्ये येणाऱ्या नेटवर्क इश्यूमुळं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

लोकलमध्ये नेटवर्कच्या अडचणींमुळं प्रवाशांची अनेक कामं खोळंबतात. यासाठी रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकलमध्ये वायफायची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोकलमध्ये वायफाय बसविले जात आहेत. परंतू, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला वायफाय प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवाशांना लोकलमध्ये मोफत वायफाय सेवा मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या धर्तीवर मुंबईच्या लोकलमध्ये ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा २ वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि कोरोनामुळं हा प्रकल्प रखडला आहे. 

रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली असून नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमधील तीन हजार ४६५ डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरू आहे.

‘कंटेट ऑफ डिमांड’अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा समावेश असेल. प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे आवश्यक आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा