Advertisement

फुकट्या प्रवाशांकडून बेस्टची २० लाखांची दंड वसुली


फुकट्या प्रवाशांकडून बेस्टची २० लाखांची दंड वसुली
SHARES

बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यासाठी बेस्टने विशेष मोहीम आखली आहे. या विशेष मोहीमेअंतर्गत एकूण २२,९६३ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आलं. या प्रवाशांकडून एकूण २० लाख ३१ हजार ४९२ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

मुंबईतील बेस्ट बसमधून दररोज किमान ३० लाख प्रवासी प्रवास करतात. पण गर्दीच्या वेळेस बेस्टमधून प्रवास करणाऱ्या फुकट्यांची संख्याही कमी नाही. अशा फुटक्या प्रवाशांवर बेस्टने जून आणि जुलै महिन्यात कारवाई केली.

बसमधून प्रवास करताना तिकीट खरेदी करणे प्रत्येकाला बंधनकारक असून, विनातिकीट प्रवास करणं हा सामाजिक गुन्हा देखील आहे. तरी बेस्टच्या सर्व प्रवाशांनी तिकीट, बस पासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा. असं आवाहन बेस्टतर्फे करण्यात आले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा