Advertisement

तिकीटसाठी महिलांची दिवा रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी

सरसकट सर्व महिलांना बुधवारपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.

तिकीटसाठी महिलांची दिवा रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी
SHARES

सरसकट सर्व महिलांना बुधवारपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल (railway minister piyush goyal) यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. त्यानुसार, सर्व महिला सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल (mumbai local) सुरु असेपर्यंत लोकलनं प्रवास करत आहेत. परंतू, महिलांना परवानगी दिल्यानंतर दुसऱ्याची दिवशी रेल्वे स्थानकाबाहेर (railway station)महिला प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळं पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वेच्या (central railways) दिवा रेल्वे स्थानकाबाहेर (diva station) महिला प्रवाशांची तिकीटसाठी मोठी गर्दी जमली आहे. दिवा रेल्वे स्थानकात असलेल्या अपुऱ्या तिकीट खिडक्यांमुळं (ticket counter) व एटीव्हीएम मशीन बंद असल्यानं महिलांची गर्दी झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी रेल्वे स्थानकातील गर्दीमुळं सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी रांगेत महिलांना सोडलं जात असून, पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

बुधवारी पश्चिम रेल्वेवरील विरार, बोरीवली, अंधेरी, वांद्रे, मध्य रेल्वेवरील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे, मुलुंड यांसह काही स्थानकांत सकाळी ११ नंतर महिला प्रवाशांच्या तिकीट खिडक्यांसमोर रांगा होत्या, तर अन्य स्थानकांत या वेळेत शुकशुकाटच होता. लोकल प्रवासाची मुभा असल्यानं महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सकाळी ११ पूर्वी कामाच्या वेळेत प्रवास करू शकत नसल्याने अनेक महिलांनी सावध प्रतिसाद देत बेस्ट आणि खाजगी वाहनाने प्रवास केला. तर दुपारी कामाला जाऊन संध्याकाळी परत येणाऱ्या आणि सणानिमित्त खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांनी प्रवास केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा