• मोनोचा रुळ टांगणीला
SHARE

करी रोड - वडाळा डेपो ते जेकब सर्कल या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याची मुंबईकर आतुरतेनं वाट पाहत आहेत. या मार्गाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. पण शनिवारी करी रोड स्थानकाजवळ मोनोरेलचा रूळ जोडणीतून सुटला. हा प्रकार वेळीच स्थानिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अपघात थोडक्यात टळला. मात्र या घटनेमुळे मोनो मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आलाय..आधीच मोनोच्या विरोधात असलेल्या स्थानिकांचा यामुळे संताप आणखीनच वाढलाय. मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्ग सुरू होण्याआधीच निखळू लागल्यानं कामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्येही घबराट निर्माण झालीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या