सांताक्रुज, विले पार्ले स्थानकाचे प्लॅटफॉर्म एका रांगेत

 vile parle
सांताक्रुज, विले पार्ले स्थानकाचे प्लॅटफॉर्म एका रांगेत

मुंबई - सांताक्रुज आणि विलेपार्ले स्थानकातील प्लॅटफॉर्म सरळ एका रांगेत येणार आहेत. याआधी उलट सुलट असलेल्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांचा गोंधळ उडत होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने या सर्व प्लॅटफॉर्मचे क्रमांक एका रांगेत करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सांताक्रुज तर 12 मार्चपासून विलेपार्ले प्लॅटफॉर्मचे नवीन क्रमांकाची मालिका कार्यन्वित झाली आहे.

सांताक्रुज रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांकात होणारा बदल 


आधीचे प्लॅटफॉर्म
क्रमांक

नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक (पश्चिम पासून पूर्वेकडे)
5
1
6
2
1
3
2
4
3
5
4
6


प्लॅटफॉर्मचे नवीन क्रमांक पश्चिमपासून पूर्व दिशेला असतील. मात्र या रचनेत सांताक्रुज आणि विलेपार्ले स्थानकात पश्चिमेकडून शिरताना आधी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहा, त्यानंतर क्रमांक एक ते चार असा आहे. ही गुंतागुंतीची क्रमवारी बदलून पश्चिमेकडून पूर्वेला एक ते सहा हे सलग क्रमांक प्लॅटफॉर्मना दिले जावेत, हा प्रस्ताव मुबंई विभागाने पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयास काही आठवड्यापूर्वी दिला होता. त्यास मुंजरी मिळाली असून रविवारी मध्यरात्रीपासून सांताक्रुज आणि 12 मार्चपासून विले पार्ले स्थानकावर हा बदल अंमलात आण्यात येणार आहे.

विले पार्ले रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांकात होणारा बदल


आधीचे प्लॅटफॉर्म
क्रमांक
नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक (पश्चिम पासून पूर्वेकडे)
5
1
6
2
1
3
2
4
3
5
4
6


Loading Comments