Advertisement

मुंबईकरांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वे १५ डबा लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार

१५ डबा लोकलच्या फेऱ्यांची संख्या १२ जानेवारीपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वे १५ डबा लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार
(File Image)
SHARES

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या १५ डबा लोकलच्या फेऱ्यांची संख्या १२ जानेवारीपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या आणखी १२ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर पहिली १२ डबा लोकल १९८६ साली धावली आणि त्यानंतर २००६ मध्ये पहिली १५ डबा लोकल प्रवाशांच्या सेवेत आली.

१२ डबा लोकल गाड्यांना तीन डबे जोडून १५ डबा लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या चर्चगेट – विरारदरम्यान १५ डबा जलद आणि धीम्या लोकल धावत आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वेने अंधेरी – विरारदरम्यान धीम्या मार्गांवर १५ डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात आली.

त्यानंतर २८ जून २०२१ रोजी या मार्गावर १५ डबा लोकलच्या २५ फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्या. या नवीन प्रकल्पामुळे १५ डबा लोकल फेऱ्या वाढवण्यास पश्चिम रेल्वेला बराच फायदा होत आहे. सध्या १५ डबा लोकलच्या दररोज १३२ फेऱ्या होत आहेत. १५ डबा लोकलच्या आणखी १२ फेऱ्या १२ जानेवारीपासून होणार आहेत.

१२ डबा लोकल गाड्यांना प्रत्येकी तीन डबे जोडून या लोकल चालवण्यात येणार आहेत. १२ फेऱ्यांपैकी अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा फेऱ्या होतील. तर सहा लोकल फेऱ्या जलद मार्गावर होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. बारा फेऱ्यांमुळे १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या १४४ होणार आहे.


UP Direction:

S.No.

From

To

Departure

Arrival

Mode

1.

Virar

Dadar

07.18

08.16

FAST

2.

Virar

Borivali

09.41

10.16

SLOW

3.

Vasai Road

Andheri

10.58

11.49

SLOW

4.

Virar

Dadar

13.11

14.22

FAST

5.

Virar

Dadar

16.03

17.08

FAST

6.

Virar

Borivali

18.39

19.17

SLOW





DOWN Direction:

S. No.

From

To

Departure

Arrival

Mode

1.

Dadar

Virar

08.30

09.36

FAST

2.

Borivali

Vasai Road

10.19

10.44

SLOW

3.

Andheri

Virar

12.01

13.03

SLOW

4.

Dadar

Virar

14.50

15.47

FAST

5.

Dadar

Virar

17.27

18.34

FAST

6.

Borivali

Nalasopara

19.22

19.54

SLOW

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा