Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

शून्य बिल, शून्य दुरुस्ती खर्च! रेल्वे स्टेशनवर सौर उर्जेवर आधारीत वॉटर कुलर

इलेक्ट्रिक कुलर्सच्या तुलनेत याच्या दुरूस्तीसाठी अधिक खर्च येत नाही. याचे वीज बिल देखील येत नाही.

शून्य बिल, शून्य दुरुस्ती खर्च! रेल्वे स्टेशनवर सौर उर्जेवर आधारीत वॉटर कुलर
SHARE

भारतीय रेल्वे सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांवर भर देताना दिसत आहे. यातच आता रेल्वेनं अनेक रेल्वे स्टेशनवर सौर उर्जेवर (सोलर) आधारित वॉटर कुलर बसवले आहेत. हे वॉटर कुलर सौर उर्जेवर आधारित आहेत. इलेक्ट्रिक कुलर्सच्या तुलनेत याच्या दुरूस्तीसाठी अधिक खर्च येत नाही. याचे वीज बिल देखील येत नाही.

मुंबईत संकल्पना यशस्वी

मुंबई विभागातील मध्ये रेल्वे झोनच्या इलेक्ट्रिक विभागानं सौर वॉटर कुलर्सची संकल्पना अगदी यशस्वीरित्या अमलात आणली आहे. मुंबई विभागातील रोहा, आपटा, नेरळ, लोणावळा स्टेशन आणि पुणे विभागातील तळेगाव स्टेशनवरती सौर उर्जेवर आधारित वॉटर कुलर बसवण्यात आलेले आहेत. २०१८ मध्ये सौर वॉटर कुलर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आसनगाव स्टेशनवर बसवण्यात आले होते.

कसं काम करतं?

सौर वॉटर कुलरची प्रक्रिया ही हिट ट्रांसपर (उष्णता हस्तांतरण) तत्वावर चालते. थंड फॅब्रिकद्वारे झाकलेल्या तांब्याच्या पाईपमधून जेव्हा पाणी जाते, त्यावेळी फॅब्रिक वॉटर ड्रिपिंग सिस्टमद्वारे सुरू होते. या प्रक्रियनंतर बाष्भीभवनाद्वारे पाणी जमा होते.

अधिक वर्ष टिकतात

सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या कुलरच्या तुलनेत सौर वॉटर कुलर अधिक वर्ष टिकतात. हे कुलर १० वर्षांपेक्षा अधिक काळ चालतात. तर इलेक्ट्रिक कुलर हे ४ ते ५ वर्षात खराब होतात. सौर वॉटर कुलरची पाणी क्षमता १५० लीटर तर सोलर पॅनेल कॅपिसिटी २५ वॉट आहे.

किती खर्च?

सौर वॉटर कुलरचे फायदे म्हणजे याच्यासाठी शून्य बिल आणि शून्य दुरूस्ती खर्च येतो. तर इलेक्ट्रिक कुलर वर्षाला १६२०Kwh पॉवर यूनिट खर्च करतात. सौर वॉटर कुलर प्रति यूनिटमागे २९ हजार १६० रुपयांची बचत करतात. यासोबतच पाण्याची गुणवत्ता देखील अधिक चांगली असते.हेही वाचा

प्रवाशांसाठी एसी लोकलमध्ये सेकंड क्लास?

सायन उड्डाणपूल २७ फेब्रुवारीपासून ५ दिवस बंद

संबंधित विषय
संबंधित बातम्या