अंधेरीतली 'ती' चोरी सीसीटीव्हीत कैद

अंधेरी - अंधेरी (पू.) इथल्या एमआयडीसी रोडवरील तीन दुकानात रविवारी चोरी झाली. या परिसरात एक आठवड्यापूर्वीही चोरी झाली होती. हा सर्व चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. दुकानमालक किशन वैष्णव यांनी सांगितलं की चोरट्यांनी 12 फेब्रुवारीला दुकानाचे टाळे तोडत सर्व सामान लंपास केला. या चोरांनी एक नाही तर चक्क तीन दुकानात चोरी केली. सुमारे एक लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचंही दुकानमालकाने सांगितलं.

Loading Comments