आगीत भाजल्याने तीन जण गंभीर जखमी

  Bhandup
  आगीत भाजल्याने तीन जण गंभीर जखमी
  मुंबई  -  

  भांडुप- भांडुप खिंडीपाडा येथील गणपती विर्सजन मिरवणूकीच्यावेळी जनरेटर सेटला आग लागून १२ मुले जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यातील गंभीर जखमी असलेल्या वेदांत हुंडे, यश पवार आणि आर्यन बावदाणे या तीन मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर क्षितीज शिंदे या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य नऊ मुलांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री गणपती विर्सजन मिरवणूक सुरू असताना जनरेटरच्या मागे ठेवलेल्या डिझेलच्या कॅनवर अगरबत्तीची ठिणगी पडून आग लागली. जनरेटरने लगेच पेट घेतल्याने यात १२ मुले भाजली आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.