Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

अंधेरी तहसील कार्यालयात सुविधांचा अभाव


अंधेरी तहसील कार्यालयात सुविधांचा अभाव
SHARES

अंधेरी - अंधेरी पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयाची सोयीसुविधांअभावी दुरवस्था झाली आहे. कार्यालयामध्ये पाणी, शौचालय नसल्याने कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
अंधेरी पश्चिम येथे असलेल्या या तहसीलदार कार्यालयात अंधेरी पूर्व/पश्चिम येथील २५ गावातील नागरिक उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला ,जमिनीची खरेदी विक्री अशा विविध कामांकरिता येत असतात. अशा मोठ्या संख्येने वर्दळ असणाऱ्या ठिकाणी पाणी तसेच शौचालयाची सोय नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे.
या कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या शौचालयाची अवस्था एकदम खराब झाली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. याबाबत तहसीलदार सुभाष काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच काकडे हे डेंग्यूने आजारी आहेत, असे सांगण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा