गणेशोत्सवासोबत समाजकार्य

 Kala Ghoda
गणेशोत्सवासोबत समाजकार्य

एलफिस्टन - डिलाईल रोडच्या बालसाथी मंडळाची स्थापना 1964 साली करण्यात आलीय. यंदा या मंडळाचे 52 वे वर्ष आहे. हे मंडळ दरवर्षी साडेसहा फुटांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करते. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या पैशातून लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसंच आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या शिबीरांचे आयोजन करण्यात येते. मंडळ बोरीवलीतील एका आश्रमाला कपडे देऊन मदत करते. भावी काळात अन्य काही सेवाभावी संस्थांना मदत करण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे. पुढील काही वर्षात शेतक-यांना मदत होईल असे काही उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येतील, अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते हेमंत दाभोळकर यांनी दिली .

 

Loading Comments