वरळी : यंदा 'सहजीवन रहिवासी गणेशउत्सव हे वरळीतील प्रसिद्ध मंडळ. यावर्षी मंडळाचे हे २९वे वर्ष आहे. नेहमी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. यावेळी मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी पीठ पैसा, वक्तृत्व, चित्रकला अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. पण मंडळाने आयोजित केलीली 'वेशभूषा स्पर्धा' चांगलीच रंगात आली. लहान मुलांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ५ वर्षाच्या चिमुकल्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी विट्ठल, बाहुबली, कृष्णाची वेशभूषा करत चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात स्फर्धेत भाग घेतला. लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे उपक्रम राबवण्यात आल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.