वांद्र्यात अवतरली प्रति जेजुरी

 Bandra west
वांद्र्यात अवतरली प्रति जेजुरी

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 19 व्या वर्षाचे मुख्य आकर्षण म्हणजे या वर्षी जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा उभारण्यात आला आहे..मुंबई भाजप अध्यक्ष अॅड.आशिष शेलार हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.. खंडोबा हे महाराष्ट्र , कर्नाटक ,आंध्रप्रदेश पर्यंतच्या राज्यात लोकप्रिय दैवत आहे.. जेजुरी मंदिर परिसरात असणा-या दिपमाळा,काळया दगडामधील कारागिरी,घोडा,शस्‍त्रे असणारी कारगिरी आहे.त्‍याची हुबेहुब प्रतिकृती यावर्षी साकारण्‍यात आली आहे. सुमारे 50 फुट उंचीचे हे मंदिर असून मंदिरासमोर नंदी,प्रवेशद्वार,दिपामाळा आणि मंदिराचा हुबेहुब गाभारा तसेच देवाची तलवार हे सर्व साकारण्‍यात आले आहे. विशेष म्‍हणजे कमीत कमी पिओपीचा वापर करून अत्‍यंत कौशल्‍याने या मंदिराची कलाकृती साकारण्‍यात आली आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्‍ट म्हणजे गणेशोत्‍सव साजरे करणारे निम्‍यातून अधिक कार्यकर्ते हे मुस्लिम आणि ख्रिश्‍चन असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठया उत्‍साहात या मंडळाचा गणेशोत्‍सव साजरा करतात.

 

Loading Comments