आ बाप्पा यम्मी छे !

  Malad
  आ बाप्पा यम्मी छे !
  • जयाज्योती पेडणेकर
  • शहरबात
  मुंबई  -  

  आपला बाप्पा सर्वांपेक्षा वेगळा ठरावा यासाठी नेहमीच सार्वजनिक मंडळ प्रयत्न करत असतात. असाच वेगळा प्रयत्न केलाय मालाड पश्चिमेकडील नरसिंग लेनमधल्या श्याम निर्मल मित्र मंडळांनं. या मंडळानं चक्क जिलेबी फाफडयाचा वापर करून गणेशमूर्ती साकारलीय. या गणेशमूर्तीसाठी 10 किलो जिलेबी, 3 किलो फाफडा, 3 किलो पापडी, सव्वा तीन किलो मीरची, अर्धा किलो काळामिरी, 1 किलो भावनगरी घाटिया, 1 किलो तिखट भावनगरी घाटिया, 2 किलो हाताने बनवलेली घाटियाचा वापर करण्यात आलाय. 8 फूट 5 इंचाची ही गणेशमूर्ती 21 किलो वजनाची आहे. मुंग्यांपासून मूर्तीच्या संरक्षणाकरिता मूर्तीवर मीठ आणि आजूबाजूला लक्ष्मण रेखा उभारण्यात आल्याचं मंडळाचे कार्यकर्ते भरत काकरेचा यांनी सांगितलं. तसंच सत्यमेव जयतेचा देखावा त्यांनी साकारलाय. 

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.