रेल्वे स्थानकावर लुबाडणारे अटकेत

 Dadar
रेल्वे स्थानकावर लुबाडणारे अटकेत
Dadar , Mumbai  -  

माहीम स्थानकात झालेल्या दरोड्याप्रकरणी रेल्वे पलिसांनी पाच आरोपींना अटक केलीय. माहीम स्थानकावरील सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना अटक केली. रमजान शेख, नामदेव कसबे, राहुल नायडू, दाविद कोरणा आणि रमेश मल्लेपांग अशी या आरोपींची नावे आहेत. सोमवारी पहाटे अरविंदकुमार पांडे माहीम फलाट क्रमांक 1 वर झोपलेला होता. त्यावेळी पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची बॅग घेऊन पसार झाले. जखमी अवस्थेत अरविंदकुमारनं पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केलं.

Loading Comments