Advertisement

घाटकोपरच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा


घाटकोपरच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
SHARES

घाटकोपर - कामराजनगर जवळील आणि खाडी परिसराच्या कांदळवनाच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटवले. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या या जागेवरील 284 अतिक्रमणे शुक्रवारी महापालिकेने बुलडोझर चढवत जमीनदोस्त केली.

कामराजनगर जवळ असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. हा खारफुटीचा भाग असल्याने या अतिक्रमणांमुळे खारफुटीची हानी होऊन पर्यावरणावर परिणाम होत होता. याबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (अतिक्रमणे) यांनी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याबाबत महापालिकेला विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केली.

परिमंडळ - ४ चे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 242 झोपड्या आणि 42 पक्की बांधकामे तोडण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेच्या 50 कामगार-कर्मचारी-अधिकारी यांच्यासह तेवढ्याच संख्येतील मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी देखील कार्यरत होते. यासाठी 6 जेसीबी मशीन आणि 6 डंपर वापरण्यात आले. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एन विभागाचे पदनिर्देशित अधिकारी विशाल साखरकर आणि सहाय्यक अभियंता (परिरक्षण) ए. एस. मंजुळ यांनी विशेष मेहनत घेतली असल्याची माहिती एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा