महापालिकेच्या घनकचरा विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

 Churchgate
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
Churchgate, Mumbai  -  

एकीकडे महापालिका 'स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई'चा संदेश देते. मात्र घनकचरा विभाग या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नरिमन पॉईंटच्या आमदार निवास बॅक रोडवर असलेल्या महात्मा फुले सोसायटीबाहेर दोन-दोन दिवस कचऱ्याचा ढीग साचलेला असतो. कचरा रोज उचलला जात नाही त्यामुळे कचरापेटीबाहेरही मोठ्या प्रमाणात कचरा पसरतो. पाऊस पडल्यास परिसरात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

 

Loading Comments