दोन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

 Andheri
दोन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
Andheri, Mumbai  -  

विक्रोळीमध्ये एका नराधमानं अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पीडित बालिका तिच्या घराबाहेर खेळत होती. आरोपीनं तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला पार्कसाईट जवळच्या डोंगरावर नेले. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेतली असता चिमुरडी गंभीर अवस्थेत आढळली. त्यांनी तिला उपचारांसाठी तातडीनं राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पीडित बालिकेची प्रकृती गंभीर असून डॉक्टर्स तिच्यावर सर्वतोपरी उपचार करत आहेत.

Loading Comments