कुलाब्यात 'द बर्निंग' बाईक

 BEST depot
कुलाब्यात 'द बर्निंग' बाईक
कुलाब्यात 'द बर्निंग' बाईक
See all

कुलाबा - शनिवारी लागलेल्या आगीत नौदल अधिकाऱ्यांचा 20 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. कुलाबा परिसरात असलेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या निवासी परिसरात ही दुर्घटना घडली.

कुलाबा परिसरात नौदल अधिकाऱ्यांची निवासस्थाने असणाऱ्या एनओएफआरए या भागात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला एका दुचाकीला लागलेली ही आग हळुहळू जवळपासच्या वाहनांमध्ये पसरली. पार्किंगमधील बाईकमध्ये स्पार्क झाल्याने ही आग लागल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, नौदल आणि कुलाबा फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्यात आली. 

Loading Comments