मुलुंडचे पोलीस मित्र

 Mulund
मुलुंडचे पोलीस मित्र

गणेशोत्सवापासून ते विसर्जनादरम्यान जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस 24 तास सज्ज असतात. यावेळी मुलुंडमधील केळकर आणि व्ही. पी. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. गणपती विसर्जनावेळी गणेश भक्तांना सर्वतोपरी मदत करता यावी म्हणून हे विद्यार्थी तत्पर झाले आहेत. यंदा दीड दिवसाच्या विसर्जनासाठी मिठागर तलाव आणि पूर्व महामार्गावरील गणेश घाट या दोन्ही ठिकाणी दुपारपासूनच हे विद्यार्थी पोलिसांना सहकार्य करत होते. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या, सात दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीही हे विद्यार्थी असेच सहकार्य करणार आहेत.

Loading Comments