गोरेगाव जुन्या पोलीस स्थानकाची दुरावस्था

 Goregaon
गोरेगाव जुन्या पोलीस स्थानकाची दुरावस्था
गोरेगाव जुन्या पोलीस स्थानकाची दुरावस्था
गोरेगाव जुन्या पोलीस स्थानकाची दुरावस्था
गोरेगाव जुन्या पोलीस स्थानकाची दुरावस्था
See all

गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर इथल्या जुन्या पोलीस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. आधी ही चौकी एसपीची चौकी म्हणून ओळखली जात होती. त्यामुळे इथे दिवस-रात्र पोलिसांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळत असे. दहा वर्षांपूर्वी इथल्या पोलिसांचे स्थलांतर करण्यात आल्याने ही चौकी दुर्लक्षित झाली आहे. सध्या इथे रात्रीच्या वेळी गर्दुल्ले वास्तव्याला असल्यामुळे चौकीचे दारे, खिडक्यांसह सर्व सामान चोरीला गेले आहे. शिवाय मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पोलीस स्थानक केव्हाही ढासळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. सदर जागा म्हाडाची असून अतिक्रमण न करण्याचा फलकही लावला आहे. या जागेचा पुनर्विकास केव्हा होईल याकडे स्थानिकांचे डोळे लागले आहेत.

Loading Comments