दिंडोशी - दिंडेशी विभागातील शिवसमर्थ प्रबोधन मंडळाच्या हेमंत शिंदे यांनी 'गणेश आगमन' या संकल्पनेवर आधारित शॉर्टफिल्म / म्युझिक व्हिडियो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मंगेश म्हात्रे यांनी प्रथम तर हर्षद पावणाक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
मनसे पुरस्कृत शिवसमर्थ प्रबोधन मंडळाने आयोजित या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धा प्रवेशिका सहभागी झाल्या होत्या. निवडक स्पर्धा प्रवेशिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यामुळे विविध गणेश आगमनाचा नजराणा गणेश भक्तांना पाहावयास मिळाले. स्पर्धेचे परीक्षण सिनेदिग्दर्शक योगेश राऊळ यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक हेमंत शिंदे यांच्यासह सतीश पवार, शशिकांत कोरी आणि प्रशांत कदम यांनी मेहनत घेतली.