मुंबई - गिरगावमधील कुंभारवाडा परिसरातल्या डॉक्टर बिल्डिंगमध्ये गणपती स्थापनेला 14 वर्ष पूर्ण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक देखावा साकारण्यात आलाय. यावर्षी अत्यंत साधेपणाने बाप्पासाठी सजावट करण्यात आली आहे. पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची असून इथे वृंदावन बनवण्यात आले आहे. याशिवाय हे मंडळ विभागातील सर्व सामाजिक कार्यात सहभागही घेते