गटाराचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

 Masjid Bandar
गटाराचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त
गटाराचे पाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त
See all

गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं मस्जिद बंदरमधले भातबाजारच्या बारदन लेनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून तिथल्या स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारण या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरीयाच्या डासांची पैदास वाढलीय. गेल्या अनेक दिवसांपासून या गटाराची सफाईही करण्यात आलेली नाही. तसंच पालिकेकडे यासंदर्भात तक्रार करूनही  कुणी लक्ष दिलं नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी केली आहे.  

Loading Comments