झिंगलेले बकरे

 Bandra west
झिंगलेले बकरे

बकरी ईद जवळ आली आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधवाकडून बक-यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र देवनारच्या कत्तलखान्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. चक्क बक-यांना देशी दारू पाजली जात आहे. पाणी आणि सोडा घालून हे मिश्रण बक-यांना दिले जात आहे. त्यामुळे इथे येणा-या ग्राहकाला तो बकरा धष्टपुष्ट दिसावा आणि ग्राहकाने त्याला लगेचच खरेदी करावा. त्यामुळे इथल्या कसाईंची कमाईही मोठ्या प्रमाणात होते. मात्र हा सर्व प्रकार जेव्हा मुंबई लाईव्हने उघडकीस आणला तेव्हा देवनारच्या मॅनेजरने बोलण्याचे टाळले.                        

Loading Comments