'विंदें'चा इको फ्रेंडली बाप्पा

MAHIM
'विंदें'चा इको फ्रेंडली बाप्पा
'विंदें'चा इको फ्रेंडली बाप्पा
See all
मुंबई  -  

माहीम - येथील मूर्तीकार केतन विंदे हे शाडूच्या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले एक नाव. विंदे यांच्या कार्यशाळेत दरवर्षी गणेशोत्सवात शेकडो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. विंदेंच्या कार्यशाळेत बनवलेल्या मूर्तींचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्तींचे हुबेहूब जिवंतपणा आणणारे डोळे. यंदा विंदे यांच्या कार्यशाळेत माघी गणेशोत्सवासाठी 44 मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या किंमती 1200 रुपयांपासून 12 हजार रुपयांपर्यंत आहेत. 6 इंचापासून 2 फूटापर्यंतच्या या मूर्तींचे नाजूक काम मुख्य आकर्षण ठरते.

या कार्यशाळेतल्या मूर्तींना पुण्यातून विशेष मागणी असते. पूर्णवेळ मातीकाम करणारे केतन विंदे हे गणेशोत्सव आणि माघी गणेशोत्सवासाठी 2006 पासून गणेशमूर्ती घडवण्याचे काम करतात. माघी गणेशोत्सव अनेक घरात नवसाचा गणपती म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तुलनेत माघी गणेशोत्सवात मोजक्या आणि ऑर्डप्रमाणेच मूर्ती घडवल्या जातात.

केतन विंदे यांनी त्यांच्या कार्यशाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही 14-15 प्रकारच्या डिझाईनचे गणपती बनवून इको फ्रेंडली मुर्तींचा ट्रेंड यंदाही सुरु ठेवला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.