ट्रेनमधील गर्दी बेतली जीवावर

Dahisar, Mumbai  -  

कुर्ला - लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस गर्दीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी ट्रेनमधून पडून अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली  आहे. याचेच एक उदाहरण समोर आले आहे.  कुर्ला स्थानकावर  एक वृद्ध  महिला पडता-पडता थोडक्यात बचावली आहे.  महिला कल्याणकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढत होती. मात्र गर्दीमुळे धक्काबुक्की झाल्याने महिलेचा पाय घसरला आणि अचानक खाली पडली. मात्र लगेचच तिने रेल्वेच्या दरवाजावर असलेल्या खांबाला धरले. त्यावेळी प्रवाशांनी मोटरमेनला  सांगून रेल्वे थांबवल्यामुळे अखेर महिलेचा जीव वाचला.             

 

Loading Comments