ड्रिम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आग

 Mumbai
ड्रिम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आग
Mumbai  -  

भांडुपच्या पश्चिमेकडील ड्रिम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये बुधवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. या आगीत पार्क केलेल्या 2 कार आणि 3 मोटारसायकल जळून खाक झाल्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय..याप्रकरणी भांडुप पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading Comments