गोरेगाव - राम मंदिर ते एस.व्हीरोडची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जोगेश्वरी ते अंधेरी पूर्व-पश्चिम इथे पूल बांधण्यात आलेल्या पुलावरील फुटपाथवर सध्या झोपड्या बांधून अनेक अनिवासी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी रात्रीच्या दरम्यान फेरीवाल्यांनी अवैधरीत्या खाद्यपदार्थांची विक्रीही सुरू आहे. तसेच याठिकाणी राहात असलेली लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हानगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.