पोलिसांसाठी बाप्पांनी वाढवला मुक्काम

 Girgaon
पोलिसांसाठी बाप्पांनी वाढवला मुक्काम
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - कर्तव्याला प्राधान्य दिल्याने पोलिसांना सणवार साजरे करता येत नाहीत. काल गिरगावात गणेश विसर्जनाची धूम सुरू असताना पोलीस मात्र बंदोबस्तासाठी उभे होते. त्यामुळे व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या बाप्पांचा मुक्काम एका दिवसाने वाढला. आता पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर या गणपतीचे आज रात्री विसर्जन होणार आहे.

यंदा व्ही.पी रोड पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे. कर्तव्य बजावत असतानाही पोलिसांकडून या बाप्पांची मनोभावे सेवा केली जाते. आता आच होणाऱ्या विसर्जन सोहळ्यात व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाप्पाला निरोेप देतील.

Loading Comments