गोरेगाव स्टेशनकडे जाण्याचा मार्ग सुधारला

 Goregaon
गोरेगाव स्टेशनकडे जाण्याचा मार्ग सुधारला
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - गोरेगाव स्थानकाला हार्बर लाईनशी जोडण्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत होता. मात्र मुंबई लाईव्हच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांसाठी पादचारी मार्ग तयार करण्यात आले आहे. गोरेगाव स्थानकावर येणाऱ्या मार्गावर चिखल आणि पाणी साचले होते. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. मात्र मुंबई लाईव्हने दाखवलेल्या बातमीनंतर प्रवाशांसाठी 10 दिवसात रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे.     

 

Loading Comments