57 वर्षांपासून होते शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

 Goregaon
57 वर्षांपासून होते शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

गोरेगाव - गोरेगावमधील आराधना क्रीडा मंडळात गेल्या 57 वर्षांपासून शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व जाणून मंडळाने ही परंपरा जपली आहे. 'विरवाणीचा आमचा राजा' म्हणून या मंडळाचा गणपती गोरेगावमध्ये प्रसिध्द आहे. यावर्षी मंडळाने कृष्णरूपी गणपतीची मुर्ती व कृष्ण वृंदावनाची सजावट साकारली आहे. "गणेशोत्सव काळात मंडळाकडून भजन, महिलांचे व लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सामाजिक भान बाळगून गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले जाते," अशी माहिती मंडळाचे व्यवस्थापक अरुण गवळी यांनी दिली. 

Loading Comments