प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या ग्रँटरोडच्या स्कायवॉकवर बेघर आश्रितांनी आपला संसार थाटला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे रात्रीच्यावेळी गर्दुल्यांचे वास्तव असून महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे. अनेकदा तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.