'व्हॅलेंटाईन डे हद्दपार करा'

  Amrut Nagar
  'व्हॅलेंटाईन डे हद्दपार करा'
  मुंबई  -  

  घाटकोपर - 'व्हॅलेंटाईन डे' हद्दपार करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. या समितीतर्फे घाटकोपरमधील अमृतनगर सर्कल येथील शिवाजी महाराज चौक येथे जनजागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 'पाश्चात्त्यांच्या वाईट संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण आपल्या देशात केले जाते, असे सांगत त्यांनी हे आंदोलन केले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ज्या पद्धतीने प्रेमाचे प्रदर्शन लोकांसमोर केले जाते. यातून एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.