शकून अपशकुनाच्या फे-यात बाप्पा

Mumbai  -  

लालबाग - यंदा लालबागचा राजा घुबडावर विराजमान झाला आणि गणेश भक्‍तांमध्‍ये शुभ-अशुभतेच्या चर्चेला उधाण आले आहे. लक्ष्मीचे वाहन घुबड. तरीही समाजात घुबडाकडे  नकारात्‍मक दृष्टिकोनातून बघीतले जाते. घुबडाविषयी लोकांच्‍या मनात विविध गैरसमज आहेत. खरे तर प्लेगसारख्या रोगापासून माणसाला वाचवण्यासाठी महत्त्वाचा पक्षी म्हणून घुबडाकडे बघायला हवे. मात्र आजही घरावर घुबड बसले तर काहीतरी अपशकून होणार अशी शंका उपस्थित केली जाते. यंदा  लालबागचा राजा घुबडावर विराजमान झाल्याने हे सकारात्मकतेचे पाऊल असेच म्हणावे लागेल.

Loading Comments