कवितेचे सामर्थ्य शब्दात - डॉ. अक्षयकुमार काळे

 Dadar
कवितेचे सामर्थ्य शब्दात - डॉ. अक्षयकुमार काळे
Dadar , Mumbai  -  

दादर - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 119 वा वार्षिकोत्सव शनिवारी दादर (पू.) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात पार पडला. या वेळी प्रमुख अथिती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे उपस्थित होते.

आज नवोदितांचे समाधान करण्यासाठी कवी कट्टा चालवण्यात येतो. कवितेचे सामर्थ्य हे त्यात वापरलेल्या शब्दात असते कारण शब्दातूनच कविता तयार होते. असे मत (90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष) डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला संग्रहालयाचे विश्वस्त अरविंद तांबोळी, प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी, कार्यध्यक्ष बबन झरेकर, कार्यपाध्यक्ष मारुती नांदविस्कर, कार्यवाह सुभाष नाईक, हेमंत जोशी, सूर्यकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान कै. डॉ. श्री. शां. आजगांवकर फिरती ढाल योजना या पुरस्काराचा मान सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या गोरेगाव शाखेला देण्यात आला. तर कै. स. बा. महाडेश्वर फिरती ढाल योजना या पुरस्काराचा यंदाचा मान मुलुंड विभागाला देण्यात आला. यासह गुणवान विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला. तर उत्कृष्टकार्य करणाऱ्या कामगार, कलावंत, नाटककार, कार्यवाह आणि सेवक, सेविका यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Loading Comments