क्षयग्रस्त रुग्णांसाठी दूध हानीकारक?

  Sewri
  क्षयग्रस्त रुग्णांसाठी दूध हानीकारक?
  मुंबई  -  

  एकीकडे रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मागणी जोर धरू लागली असताना, क्षयरोरोगग्रस्त रुग्णांना दूध द्यायचे की नाही यावरून रुग्णालयाने संभ्रम निर्माण केला आहे. शिवडी (प.) इथले हे क्षयरोग रुग्णालय आहे. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आहारात अंडी, मटण, चिकन यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली होती. अद्याप त्यांना पोषक आहारच दिले जात नसताना रोजच्या आहारात दूध देण्याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने शंका उपस्थित केली आहे. दुधाचे पाश्चरायझेशन होत असल्याने त्यातील विषाणू, आजार पसरवणारे जीवाणू ब-याचशा प्रमाणात नष्ट झाले तरी बॅक्टेरिया, मायक्रोब्स मारले जात नाहीत. अशी माहिती रुग्णालयाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम मार्गदर्शनाखाली यावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.    

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.