अंधेरीत अवतरले कुणकेश्वर मंदिर !

अंधेरीचा राजा मंडळानं देवगडमधल्या श्री कुणकेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारलीय. प्रसिध्द आर्ट डिझायनर धर्मेश शहा यांच्या संकल्पनेतून या भव्यदिव्य मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आलीय. यासाठी लाकूड आणि लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर साई सुमन यांनी बाप्पासाठी  वस्त्र डिझाईन केले आहे. मंडळाचे 350 स्वयंसेवक बाप्पा  आणि भक्तांच्या सेवेसाठी  दिवस रात्र कार्यरत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 21 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आल्याची माहिती आझाद नगर उत्सव समितीचे प्रवक्ते उदय सालियन यांनी दिली. 

 

Loading Comments