मालाडमध्ये कारवाई करताना पोलिसाला रोखले

 Malad West
मालाडमध्ये कारवाई करताना पोलिसाला रोखले

मालाडमध्ये शुक्रवारी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय भाऊराव कदम (५२) हे तपास करण्यासाठी प्रतापनगर परिसरात गेले होते.  ही कारवाई सुरू असतानाच गायत्री चाळीतील कुटुंबियांनी कदम यांना दमदाटी केली. अणि निघून जाण्यास सांगितले. दमदाटी करणाऱ्या धीरज सिंग (१९), निरज सिंग (२८), वंदना सिंग (४८) आणि प्रिती सिंग (२४) यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Loading Comments