लालबागचा ब्रीज पुन्हा वाहतुकीसाठी खुला

  Parel
  लालबागचा ब्रीज पुन्हा वाहतुकीसाठी खुला
  मुंबई  -  

  लालबाग - लालबाग फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. सीएसटी-दादर वाहतूक एका लेनमध्ये तर दादर-सीएसटी दोन्ही लेनमध्ये वाहतूक सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी फ्लायओव्हरवरील जॉईन्ट पॉईंटचा रबर सील पडल्यामुळे रस्त्याला भेग पडली होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

  यापूर्वीही लालबागचा हा फ्लायओव्हर यामुळेच बंद करण्यात आला होता. वारंवार रस्त्याला भेगा पडत असल्याचे समोर आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक बनत चालला आहे. हा ब्रीज एमएमआरडीएच्या अंतर्गत येत असून 2011 मध्ये हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.