पश्चिम उपनगरातील गजबजलेलं ठिकाण म्हणजे मालाड. मालाडमध्ये वाढत असलेली कॉपोर्रेट कार्यालये, मॉल, शाळा यामुळे मालाड स्टेशन परिसरातून हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असतात. मात्र प्रवाशांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. याचा फायदा घेऊन रिक्षाचालक मनमानी कारभार चालवतात. यासाठी प्रवाश्यांनी मालाड लिंक रोड- राजन पाडा- भंडारवाडा- मित्तल कॉलेज- लिबर्टी गार्डन ते मालाड रेल्वे स्टेशन मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी केलीय. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे मालाडचे सरचिटणीस विनोद घोलप यांनी बेस्ट समिती आणि महापौरांकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केलीय.